Maharashtra Cabinet Expansion Latest Marathi News saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; अखेर मुहूर्त ठरला? कुणाला मिळणार संधी?

Maharashtra Cabinet Expansion Latest News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन आज १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

Satish Daud

Maharashtra Cabinet Expansion Latest News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन आज १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत.

एकनाथ शिंदेंपाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा दिल्लीला रवाना होणार असल्याची माहीती आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट सुद्धा घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात?

शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युतीसरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना (Cabinet Expansion) डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर राहणार आहे.

शिंदे गटाला केंद्रात किती जागा मिळणार?

महाराष्ट्रात भाजसोबत हातमिळवणी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाला मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात २ जागा मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असून त्या जागी कोणाची वर्णी लावायची? हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोडण्यात आला आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू होताच, राज्यातील भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केल्याचं कळतंय. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या आमदाराला संधी मिळणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT