Ajit Pawar Vs Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : लाडक्या बहिणीवरुन महायुतीत धुसफूस; विधानसभेपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटला

Eknath Shinde vs Ajit Pawar : लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात योजनेच्या नावावरून वादाच्या ठिणग्या उडत आहेत.

Satish Daud

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र, योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात योजनेच्या नावावरून वादाच्या ठिणग्या उडत आहेत.

अजित पवार गटाकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचे नाव बदलून 'माझी लाडकी बहीण' असं नामकरण करून प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. इतकंच नाही, तर शिंदेंच्या शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमावर बहिष्कार देखील टाकलाय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा काढली आहे. आज त्यांची यात्रा पुण्यातील आंबेगाव तालुक्यात येणार आहे. यात्रेपूर्वी आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे बॅनर्स लावले आहेत.

या बॅनर्सवरुन 'मुख्यमंत्री' शब्द वगळून टाकण्यात आलाय. यावरुन शिवसेना शिंदे गटातील नेते तसेच पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी थेट महायुतीच्या बैठकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुती असतानाही आंबेगाव-शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल का दिली जात आहे? असा सवाल शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी उपस्थित केलाय. याच नाराजीतून त्यांनी मतदारसंघात आज होणाऱ्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT