Devendra Fadnavis Vs Ajit Pawar News Latest SAAM TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : काय प्रॉब्लेम आहे?... अजित पवारांच्या 'त्या' टीकेवर देवेंद्र फडणवीस थेटच बोलले!

Devendra Fadnavis Vs Ajit Pawar : अजित पवार यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे.

Saam TV News

अभिजीत देशमुख

Devendra Fadnavis- Ajit Pawar News : चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटावर आज, सोमवारी जोरदार टीका केली. त्याला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Kasaba Bypoll ) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (MVA) मेळाव्यात अजित पवार यांनी भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. आजारी असतानाही नेत्यांना मतदानासाठी नेलं, अशी टीका पवार यांनी केली होती. या टीकेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पवार यांना टोला लगावला.

यांना काय प्रॉब्लेम आहे? असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नाव न घेता केला. आमच्याकडे असे नेते आहेत की, जे पक्षाकरिता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मतदान करायला येतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या पक्षासारखे स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत, असा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

डोंबिवलीत बीबीएनजी जागतिक बिझनेस परिषदेला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले की, आज ब्राह्मण समाजात मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार झाले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळावे आणि उद्योजकता ब्राह्मण समाजात वाढावी या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

Monsoon Health : मुलांना सतत सर्दी-खोकला? हा नैसर्गिक उपाय ठरेल सुरक्षित आणि प्रभावी

HIV In Women: महिलांमध्ये HIV ची कोणती लक्षणे दिसतात?

SCROLL FOR NEXT