
Pune By Poll Election: कसबा पेठ विधानसभा पोट निवडणुकीत (By Election) महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होणार असं चित्र आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निवडणूकीसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणूकी प्रचाराबाबत रणनितीवर चर्चा केली.
यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना सुचनाही केल्या.
आगामी चिंचवड आणि कसबा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुढाकार घेतला. ज्यामध्ये त्यांनी "दिवसातले १८ तास काम करा असे सांगत कसबा आणि चिंचवड मध्ये मतांची विभागणी होवू यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, त्यासाठी आपल्यामध्ये एकजूट राहिली पाहीजे," असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
"हे घटनाबाह्य सरकार आहे, स्थगिती देणारं सरकार आहे, त्यामुळे गद्गारांना जनता काय जागा दाखवते हे अलिकडच्या निवडणूकीत दिसले, असा टोला लगावत सहानुभूती वर नाही ही निवडणूक विकासावर लढवायची आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे सांगा," अशा सुचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
त्याचबरोबर यावेळी बोलताना "आपण तिघे एकत्र आहोत,वंचितलाही सोबत घेण्याचा प्रयन्त सुरू आहे, वंचितने आता सेनेसोबत युती केली आहे, त्यांनीही महाविकास आघाडीसोबत अशी इच्छा आहे, मतांची विभागणी होणार नाही यासाठी प्रयन्त करणार आहोत, असे सांगत बोलताना शब्द जपून वापरा, कोणी दुखावणार नाही याची खबरदारी घ्या, हलक्या कानाचे राहू नका," असेही अजित पवार म्हणाले. (Pune Election)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.