Deputy CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! दसऱ्यानंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल, एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार

Shiv Sena Cabinet Changes: शिवसेना शिंदे गटात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Priya More
  • दसऱ्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार आहेत

  • संजय शिरसाट आणि दादा भुसे यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता

  • एकनाथ शिंदे तरुण आमदारांना मंत्रिपद देणार असल्याची चर्चा सुरू

  • योगेश कदम आणि आशिष जयस्वाल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे

सूरज मसूरकर, मुंबई

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांच्या कामांवर एकनाथ शिंदे नाराज आहेत. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असून लवकरच शिंदेसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.

असे देखील सांगितले जात आहे की, तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमंत्री पद देत त्यांची पदोन्नती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे त्या यादीमध्ये संजय शिरसाट, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांची नावं असल्याचे सांगितले जात आहे. राज्यमंत्रिपदी असलेले योगेश कदम, आशिष जयस्वाल या दोघांना राज्यमंत्रिपदावरून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर काही नव्या आमदारांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शिंदेसेनेतील मंत्र्यांच्या कामगिरीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांची बैठक बोलावून नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिली. जनतेची कामं, मतदारसंघातील प्रश्न आणि पक्षसंघटनेच्या वाढीकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीही कामगिरी सुधारली नाही तर मंत्रिपद गमवावं लागू शकतं, असा इशारा शिंदेंनी दिल्याचे वृत्त आहे.

दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. असे असताना शिंदेसेनेच्या मंत्र्यांना आपले मतदारसंघ सोडूशी वाटत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत या मंत्र्यांना तंबी दिली होती. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मंत्री जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांचे दौरे का करत नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केला होता. ज्या मंत्र्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे त्या मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याचे आदेश शिंदेंनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात

Old Monk : ओल्ड मॉन्कची विक्री पुन्हा सुरु होणार? अखेर कंपनीने 'ती' अट मान्य केली

गोकुळमध्ये मोठा राजकीय भूकंप! कोरमच्या तिढ्यामुळे सत्तासंघर्ष टोकाला; हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने खळबळ

High Blood Pressure: गावखेड्यांत हाय ब्लडप्रेशर वाढला! 3 पैकी 1 व्यक्ती त्रस्त, कारणे आणि आकडेवारी धक्कादायक

Maharashtra Politics: अजितदादांच्या पक्षात उलथापालथ होण्याची शक्यता, राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT