Congress Mumbai meeting Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभेच्या तयारीला सुरुवात, मुंबईत आज काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका; काय निर्णय होणार?

Congress Mumbai meeting : विधानसभा निवडणुकीत महायुतीला धूळ चारण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका होणार आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय. आता विधानसभआ निवडणुकीतही महायुतीला पराभवाची धूळ चारण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. आज विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका होणार आहे. मुंबईतील हॉटेल लिलामध्ये या दोन्ही बैठका होणार आहेत.

प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात गठित केलेल्या काँग्रेसच्या समितीची सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता प्रदेश काँग्रेसच्या समितीची बैठक घेतली जाणार आहे.

या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole), विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

विशेष बाब म्हणजे, मुंबईच्या जागावाटपसंदर्भात काँग्रेसची 3 सदस्यांची वेगळी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख जागावाटपसंदर्भात चर्चा करणार आहेत.

तर राज्यातील जागावाटपसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील चर्चा करणार आहे. त्यामुळे या बैठकीत काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढण्याचा निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT