Maharashtra Politics 
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एमआयएमच्या २ गटात तुफान राडा, जलील यांच्यासमोरच बाचाबाची, नेमकं झालं काय? VIDEO

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics :  मुंबई प्रदेशाध्यक्षपद बदलण्यावरून एमआयएम पक्षाच्या बैठकीत राडा झाला. एमआयएम पक्षाची आज मुंबईमध्ये बैठक होती, त्या बैठकतीमध्ये मुंबई प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा झाली. पण त्याच वेळी दोन गटामध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. धक्कादायक म्हणजे, हा गोंधळ सुरु होता त्यावेळी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.

मुंबईमध्ये आज एमआयएम पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलण्यात आला. मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवले. त्यानंतर फैयाज यांच्या समर्थकांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये राडा केला. त्यामुळे दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. हा राडा कॅमेऱ्यात कैद झालाय. माजी खासदार इम्तियाज जलील त्यावेळी उपस्थित होते.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्याआधीच एमआयएमचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. एमआयएमचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. इम्तियाज जलील यांच्यासमोरच राडा झाला, पण ते काहीच बोलले नाहीत, त्याचाही राजकीय चर्चा सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT