Maharashtra Politics cm eknath shinde reaction on devendra fadnavis mi punha yein bjp video  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'मी पुन्हा येईन' भाजपकडून फडणवीसांचा VIDEO ट्वीट; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political News: मी पुन्हा येईन' भाजपकडून फडणवीसांचा VIDEO ट्वीट; मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले वाचा...

Satish Daud

Maharashtra Political News

राज्याच्या राजकारणात शुक्रवारी एका ट्वीटने चांगलीच खळबळ उडवून दिली. भाजपने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हा व्हिडीओ ट्वीट केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान, भाजपच्या या ट्वीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ पाहिला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सावध भूमिका घेतली. दुसरीकडे उदय सामंत वगळता शिंदे गटाच्या कुठल्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे लागेल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा फडणवीसांच्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली. एका ट्वीटवरुन काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संकेत देण्यात आला नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर अनेकांनी शपथविधी कधी आहे? असा प्रश्न विचारला. यानंतर भाजपने अवघ्या तासाभरात ही पोस्ट डिलिट केली.

नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन... या शीर्षकाखाली महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केला होता. ३१ सेकंदाचा हा व्हिडीओ होता. यामध्ये मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन... गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन... शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..., असं देवेंद्र फडणवीस बोलताना दिसून येत होते.

'मी पुन्हा येईन' फडणवीसांनी म्हटली होती कविता

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा 'मी पुन्हा येईन' या वाक्याचा पुनरुच्चार केला होता. तसेच एका कार्यक्रमात त्यांनी ही कविता म्हटली होती. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली होती. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT