Maharashtra Politics CM Eknath Shinde departed gujarat for Meet Minister Amit Shah  SAAM TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी गुजरातला रवाना; अमित शहांची घेणार भेट, कारण काय?

CM Eknath Shinde News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी गुजरातला रवाना झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

CM Eknath Shinde Latest News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी गुजरातला रवाना झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. गुजरामध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

अहमदाबाद येथे उतरून मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल लीला येथे थांबणार आहेत. शिंदे अचानक गुजरातला का गेले? या मागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी म्हणजेच २७ ऑगस्ट परभणी दौऱ्यावर होते.

यावेळी त्यांनी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तातडीने गुजरातला रवाना झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे अचानक गुजरातला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची दाट शक्यता आहे. महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार लवकरात लवकर पार पाडण्याबाबत शिंदे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

परभणीमध्ये रविवारी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना विरोधकांना टोला लगावला

त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुद्द्याला हात घातला. मागच्या महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील दोन ते अडीच कोटी रुपये खर्च झाले होते. मागच्या एका वर्षात १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

यावेळी शिंदेंनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला. पाटणामध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरही त्यांनी निशाणा साधला. "आपण पाटणपासून सुरूवात केली आणि काही लोकं पाटण्यामध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले",असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT