Maharashtra Politics Breaking News: Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, स्वागताचे फ्लेक्सही झळकवले; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

Maharashtra Politics Breaking News: आज शरद पवार हे जुन्नर भागातील दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांची अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

रोहिदास गाडगे

जुन्नर, ता. २५ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असतानाच पुण्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. एकीकडे जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेमधून महाराष्ट्र पिंजून काढत असतानाच शरद पवारही राजकीय डावपेच टाकत आहेत. आज शरद पवार हे जुन्नर भागातील दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांची अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

जुन्नर तालुक्यातील दौऱ्यादरम्यान कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली आहे. ही भेट जुन्नरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. इतकेच नव्हेतर अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या स्वागताचेही भलेमोठे फ्लेक्स झळकावले आहेत. त्यामुळे अतुल बेनके यांच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे? ते शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, याआधी गेल्याच महिन्यामध्ये अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हेच्या घरात ही शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी राजकारणात काहीही घडू शकतं, पवार काका-पुतणे विधानसभेपुर्वी एकत्र येऊ शकतात. असे सूतोवाच बेनकेंनी दिले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विधानसभेआधी अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT