Vasai-Virar Politics  Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Maharashtra Politics: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. या सर्वांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • वसई–विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला

  • कल्पक पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

  • रविंद्र चव्हाण आणि राजन नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

  • महापालिका निवडणुकीपूर्वी वसई-विरारमध्ये भाजपाची ताकद वाढली

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडलं. हितेंद्र ठाकूर यांच्या निकटवर्तीयांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे निकत्वर्तीय कल्पक पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीआधीच वसई -विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडले आहे.

बहुजन विकास आघाडीचे परिवहन सभापती कल्पक पाटील, युवा विकास आघाडीचे मिलिंद सासवडकर, माजी नगरसेवक राजेश ढगे,माजी नगरसेविका सुषमा दिवेकर, वॉर्ड अध्यक्ष प्रतिभा वर्तक, माजी नगरसेविका ज्योती राऊत, माजी नगरसेविका ॲड. माया चौधरी, वॉर्ड अध्यक्ष संतोष मेरतीया, विनीत जैन, राजेश राऊत, काँग्रेसचे वसई -विरार जिल्हा उपाध्यक्ष मेहुल मोने, दिव्या सोलंकी, श्रद्धा भोसले आणि अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. हा पक्षप्रवेश सोहळा नालासोपारचे आमदार राजन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सर्वाचे रविंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये स्वागत केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'गतिमान आणि पारदर्शक' नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिसराच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र, राज्य आणि महापालिका येथे एकविचाराचे सरकार असले तर विकास वेगाने होतो.'

तसंच, 'वसई - विरार परिसरातील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी कोस्टल रोड विरार पर्यंत न्यायचा आहे, हे काम केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच करू शकते. वाढवण बंदर, विमानतळ यामुळे नागरी सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी पालिकेची सत्ता योग्य आणि सक्षम हातात जाणे गरजेचे आहे. विरोधकांच्या भावनिक आवाहनांना बळी पडू नका ही महापालिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दत्तक म्हणून द्या आणि परिसराचा कायापालट वेगाने झालेला पहा.' असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - भगीरथ भालके यांच्यावर गुन्हा दाखल

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

Hindu Wedding Ritual: लग्नामध्ये नवरी वराच्या डाव्या बाजूला का बसते? कारण काय?

शीतल तेजवानीच्या मुसक्या आवळल्या, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्या मास्टरमाईंडचे काळे कारनामे समोर

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

SCROLL FOR NEXT