Maharashtra Politics Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: आगामी निवडणुका भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार? मुख्यमंत्रीपद कुणाकडे? वाचा...

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political Latest News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुका भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट पडले आहेत.

एकीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मैदानात उतरून नव्याने पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अजित पवार गट लोकसभेच्या १३ तर विधानसभेच्या ९० जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार गट ५५ विधानसभा मतदारसंघ कायम राहणार असून उर्वरित ३५ विधानसभा मतदारसंघात त्यांचे बहुतांश उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांसमोर असतील. अजित पवार यांच्या गटाला विदर्भ आणि शहरी भागात भाजपला झुकते माप असेल.

इतकंच नाही तर, ग्रामीण भागात अजित पवार गटाला मतदारसंघ वाटपात प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद (संभाजीनगर) या 'एमआयएम'कडील एकमेव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवारी मिळेल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

विधानसभेत तिन्ही पक्ष समान जागेवर लढणार?

विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट आणि शिंदे-भाजप युतीमध्ये (Shivsena-BJP) समान जागावाटप होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. अजित पवार आणि शिंदे गट प्रत्येकी ९० जागा लढणार असून उर्वरित जागा भाजप लढणार आहे. दरम्यान, ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्यांचाच मुख्यमंत्री असेल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT