Legislative Council of Maharashtra
Legislative Council of Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपच्या हालचाली सुरू; काय आहे रणनीती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशातं सावंत

मुंबई: राज्यात सत्तांतर घडवल्यानंर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता विधीमंडळातील विधान परिषदेच्या (Legislative Council of Maharashtra) सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे (BJP) आमदार राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली होती. आता विधान परिषदेचे सभापतीपदही आपल्याकडेच असावे असा भाजपचा आग्रह असून भाजपने त्यासाठी हालचालीही सुरु केल्या आहेत. विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचा सभापती व्हावा यासाठी सभापती निवडीपूर्वी राज्यपाल कोट्यातील १२ आमदार नियुक्त व्हावे यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे. (Maharashtra Political News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे २४, शिवसेनेकडे ११ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. तसेच १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल अशी रणनीती भाजपने आखली असल्याची माहिती आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

SCROLL FOR NEXT