Ganesh Naik On Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पक्षानं परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन, भाजपच्या मंत्र्याचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Ganesh Naik On Eknath Shinde: ठाण्यामध्ये जाऊन भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं. पक्षानं परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन, असा थेट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला.

Priya More

Summary -

  • गणेश नाईक यांच्या विधानामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये नवा वाद

  • महापालिका निवडणुकीनंतर युतीवरून नाराजी व्यक्त

  • 'पक्षानं परवानगी दिली तर नामोनिशान संपवेन', असे विधान त्यांनी केले

  • ठाणे, कल्याण, उल्हासनगरमधील कार्यकर्ते खूश नसल्याचा केला दावा

शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळू आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगले यश मिळवले त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी ठिणग्या उडताना दिसत आहेत. गणेश नाईक यांनी पु्न्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 'पक्षानं परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन.', असं खळबळजनक विधान करत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ठाणे, कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची शिवसेनेबरोबर युती झाल्यामुळे परवड झाली, अशी खंत भाजपचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केली. युती झाल्यामुळें वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. 'भाजपला जर खुली दिली असती तर भाजपाचा सर्व ठिकाणी महापौर सगळीकडे बसला असता.' अशी भावना व्यक्त करून ठाण्यात येऊन गणेश नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे. 'भाजपाने परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन.', असे आवाहन देखील गणेश नाईक यांनी शिंदेंना दिले.

तसंच, गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीवरून नाराजी व्यक्त करत सांगितले की, ‘मी बोललो होतो ना महायुती होऊच नये. सगळ्यांनी आपापले घोडे रथ युद्धामध्ये आणावे आणि युद्ध संपल्यानंतर परत एकत्र यावे. ज्या पक्षांचे जास्त नगरसेवक त्यांना संधी द्यावी. इतरांना दुसरी पदं वाटता आली असती हे माझं व्यक्तिगत मत आहे. हे माझं पर्सनल मत आहे याचा पक्षाची काय संबंध नाही. ठाण्यातील भाजपचा कार्यकर्ता हा खूश नाही. कल्याणमधील कार्यकर्ता खूश नाही, उल्हासनगरमधील कार्यकर्ता खूश नाही. युद्धात जिंकलो आणि तहात हरलो असं कधी होतच नाही.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

Girija Oak: गोड गोजिरी, लाज लाजरी; गिरीजा ओकचं ब्लॅक आउटफिटमध्ये सुंदर फोटोशूट

Panchgrahi Yog: 500 वर्षांनंतर बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नोकरी-बिझनेसमध्ये मिळणार धनलाभाची संधी

WEH-BKC Bridge Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी प्रवास होणार सुसाट, नवा पूल लवकरच होणार सुरू; कोणाला होणार जास्त फायदा? वाचा

Laughter Chef 3 Winner : शेवटच्या क्षणी 'काटा' अन् 'छुरी'मध्ये टक्कर; 'लाफ्टर शेफ सीझन 3'ची ट्रॉफी कोणी जिंकली?

SCROLL FOR NEXT