Devendra Fadnavis and amit shah : Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपचा मास्टर प्लान, महाविजय 3.0 चं नियोजन

BJP Master Plan For Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवा यासाठी भाजपकडून आतापासून तयारी सुरू झाली आहे. भाजपचे शिर्डीमध्ये एकदिवशीय अधिवेशन होणार असून यामध्ये १५,००० प्रतिनिधी उपस्थित राहतील.

Priya More

गणेश कवडे, मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लान तयार केला आहे. या निवणुकीसाठी भाजपने महाविजय 3.0 चे नियोजन केले आहे. शिर्डीत रविवारी एकदिवशीय अधिवेशन होणार आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवू हे लक्ष्य रविवारी भाजपच्या राज्य अधिवेशनात निश्चित केले जाणार आहे.

शनिवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महत्वाच्या २ बैठका घेणार आहेत. एक बैठक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसह असणार आहे. तर दुसरी बैठक आमदार आणि मंत्र्यांसह असणार आहे. रविवारी अधिवेशन समारोपीय सत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करतील. रविवारी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या राज्य अधिवेशनाला राज्यभरातील १५,००० प्रतिनिधी उपस्थित राहतील.

शिर्डीमध्ये होणाऱ्या अधिवेशनाला येण्यापूर्वी राज्यभरातील प्रतिनिधींना प्रत्येकी २५० सदस्यांची नोंदणी करावी लागेल. पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेची संख्या १.१ कोटी असून १.५ कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ११ कोटी सदस्यांसह भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान करणाऱ्या कुटुंबांची जाणीव असून कार्यकर्त्यांनी घर चलो आंदोलन राबवले पाहिजे. पक्षाला हे सुनिश्चित करायचे आहे की पक्षाला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंदणी केली आहे.

तसंच, भाजप १० जानेवारी रोजी 'घर चलो मोहीम' राबवणार आहे. भाजपने मोबाईल नंबर जारी केला आहे जिथे नोंदणी करू शकता. मिस्ड कॉल देऊन ही डिजिटल नोंदणी करू शकता. या मोहिमेत प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच सक्रिय सदस्यांची नोंदणी करणे देखील समाविष्ट असेल.दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळावे यासाठी आतापासूनच भाजपने तयारीला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT