
मुंबईमध्ये नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसे अॅक्शन मोडवर आली आहे. मुंबईतील भांडुपमध्ये एका रस्त्याचे नाव 'ऑक्सफर्ड हायस्कूल मार्ग' महानगरपालिकेद्वारे बदलण्यात आले. यावर मनसेने आक्षेप घेतला. तसेच रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, असा आग्रह मनसेच्या नेत्यांनी केला आहे.
भांडुप मधील रस्त्यांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. भांडुप स्टेशन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज तलावाकडे जाणारा टॅंक रोडच्या परिसराला पालिका प्रशासनाकडून ऑक्सफर्ड हायस्कूल मार्ग असे नाव दिले होते . त्यानंतर मनसेने या नामांतराला आक्षेप घेत या रस्त्याचे नाव हे छत्रपती शिवाजी महाराज तलाव मार्ग, असे करावे अशी मागणी केली आहे. जिथे जिथे ऑक्सफर्ड हायस्कूल मार्गचे नामफलक लावण्यात आले आहेत. तिथे तिथे मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज तलाव मार्ग असे फलक लावले. पालिका प्रशासनाकडून जर वेळेत, या रस्त्याचे नाव बदलले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय.
भांडुपच्या स्टेशन रोडवरुन छत्रपती शिवाजी महाराज तलावाकडे जाणारा टॅन्क रोड आहे. या रोडच्या परिसराला महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड हायस्कूल मार्ग असे नाव दिले आणि तिथे या नावाने फलक देखील लावले. यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि रस्त्याचे नाव बदलावे अशी मागणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडुप शाखा अध्यक्ष सुनील नारकर यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.