Mumbai BJP Meeting Latest Update Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभेसाठी भाजपची रणनिती ठरली, सागर बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत काय चर्चा झाली? पाहा VIDEO

Satish Daud

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच शुक्रवारी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर रात्री ८ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १ वाजता संपली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रावसाहेब दानवे पाटील, पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.

या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीत नेमक्या कोणकोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "बैठकीत आमची विधानपरिषद आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून १० नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत पाठवली जाणार आहे".

"आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचे गणित लक्षात घेऊनच आम्ही विधानसपरिषदेसाठी उमेदवार निश्चित करणार आहोत. यासाठी उमेदवारांचा विधानसभा क्षेत्रात किती प्रभाव आहे. तसेच त्यांना संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणे कशा पद्धतीने बदलतील", हे मुद्दे विचारण्यात घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

लोकसभेत ज्या ठिकाणी आमची ताकद कमी पडली, त्याठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, असं बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार केली जाणार असून याआधारे उमेदवारांची निवड, प्रचार आणि रणनीती या गोष्टी निश्चित होतील. यासंदर्भात कोअर कमिटीची आणखी एक बैठक पार पडेल. त्यात ही ब्लू प्रिंट निश्चित केली जाईल, असंही बावनकुळे म्हणाले.

यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा देखील साधला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटारडेपणा केला. त्यांनी आदिवासी महिला आणि जनतेला फसवलं. संविधान बदलले जाईल आसा खोटारडा प्रचार करून त्यांनी नॅरेटिव्ह पसरवून मते घेण्याचे काम केले. पण आता मोदीजींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली असून जनता या खोटारडेपणातून बाहेर निघेल. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात डबल इंजिनचे सरकार येईल, असंही बावनकुळे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

Marathi News Live Updates : उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

Nandurbar News : भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

VIDEO : जुन्नरचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला; बघा काय केली मागणी

SCROLL FOR NEXT