Sanjay Raut Attacks Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांना तातडीने अटक करा, ईडी-सीबीआयची चौकशी लावा; संजय राऊतांची मोठी मागणी

Sanjay Raut Attacks Devendra Fadnavis : विधानपरिषद निवडणुकीत आमचा एकही आमदार फुटला नाही. पण त्यांचे २० आमदार फोडले, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

Satish Daud

पुण्यात रविवारी भाजपचे महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला. मात्र, आम्ही विधानसपरिषदेत त्यांच्या फुग्याला टाचणी लावली. आमचा एकही आमदार फुटला नाही. पण त्यांचे २० आमदार फोडले, असा चिमटा फडणवीसांनी काढला. त्यांच्या या विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.

"राज्यात फोडाफोडीचे मोठे राजकारण सुरू आहे. पैसा फेको तमाशा देखो असा सर्व खेळ सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले. हे आमदार त्यांनी चिंचोके देऊन फोडले का?" असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

"महाविकास आघाडीचे जे आमदार फुटले त्यांना प्रत्येकी ५० कोटी रुपये वाटण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना तातडीने अटक करा. त्यांच्यावर ईडी-सीबीआयची चौकशी लावा. तुम्हाला भ्रष्टाचार नकोय तर भ्रष्टाचारी गृहमंत्री कशाला पाहिजेत", असा संताप देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) जर सच्चे असतील, तर ते देवेंद्र फडणवीस यांना अटक करतील. राज्याचे गृहमंत्री गर्वाने सांगतात की, आम्ही २० आमदार फोडले. फुकट फोडले का? की दहीभात देऊन फोडले? आमदार फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पैसे आणले कुठून? याची अमित शहा चौकशी करणार आहात का?"

"जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची चौकशी केली, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत, हे सांगायला आम्हाला लाज वाटते असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असून ठोकून काढा अशी भाषा वापरतात. त्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. आगामी विधानसभा निवडणुकीत नागपुरातून त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही", अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT