Maharashtra Politics Ajit Pawar Group encroachment on Eknath Shinde 13 constituencies ssd92 Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा? आगामी लोकसभेसाठी अजित पवारांचा मोठा प्लॅन

Eknath Shinde vs Ajit Pawar: अजित पवार गटाकडून ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार आहे, त्यात शिंदे गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, अजित पवार गटाकडून राज्याचा दौरा करण्यात येणार आहे. याशिवाय ९ मंत्र्यांकडून राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.

शुक्रवारी मुंबईतील मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकेर यांनी पक्षातील पदाधिकारी तसेच नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे नेते तसेच मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला.

विशेष बाब म्हणजे, अजित पवार गटाकडून ज्या लोकसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी दौरे करण्यात येणार आहे, त्यात शिंदे गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. यापूर्वी भाजपने काही महिन्यांआधीच शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले, सोबतच काही केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे.

त्यातच आता अजित पवार गटानेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या सरकारमध्ये एन्ट्रीनंतर शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

आता अजित पवार यांनी शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघात पक्षवाढीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून असून हे गंमतजंमतचे सरकार आहे, अशी टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT