Sharad Pawar-Dilip Walse Patil News : शरद पवार-दिलीप वळसे पाटील एकाच मंचावर येणार; राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र

Pune Political news : ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणालीचे तंत्रज्ञान व बायो सीएनजी या नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण यावेळी होणार आहे.
Sharad Pawar-Dilip Walse Patil
Sharad Pawar-Dilip Walse PatilSaam Tv

Pune News : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक नेते शरद पवारांची साथ देत अजित पवार यांच्यासोबत गेले. यामध्ये शरद पवारांची निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश आहे. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एका चर्चासत्र कार्यक्रमात एकत्र येत आहेत.

पुण्यातील कार्यक्रमात शरद पवारांसमोर अजित पवारांनी येणं टाळल्याचं पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील काय भुमिका घेणार हेही पाहावं लागणार आहे. (Latest marathi News)

Sharad Pawar-Dilip Walse Patil
Mumbai Crime News : व्यावसायिक अपहरण प्रकरणात 3 आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा फरार

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे आयोजित तांत्रिक चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे उद्या कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमावेळी शरद पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील एकत्र येणार आहेत. ऊस स्वच्छतेच्या यांत्रिक प्रणालीचे तंत्रज्ञान व बायो सीएनजी या नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण यावेळी होणार आहे. (Political News)

Sharad Pawar-Dilip Walse Patil
CCTV Footage : आईसोबत वाद घातल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणासह मित्रावर कोयत्याने हल्ला, कल्याण पूर्व कैलास नगरमधील घटना

नुकतेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना दिलीप वळसे पाटील आणि अमित शाह यांच्या सहकार क्षेत्रातील काम विषयी चर्चाही झाली होती.

त्यातच राज्यात सहकार क्षेत्राला बळकटी आणण्याची जबाबदारी अमित शहा यांनी वळसे पाटलांवर सोपवली आहे. अशातच आता शरद पवार आणि वळसेपाटील एकाच व्यासपीठावर चर्चासत्रात सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तृळात चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com