Kalyan News
Kalyan NewsSaam TV

CCTV Footage : आईसोबत वाद घातल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणासह मित्रावर कोयत्याने हल्ला, कल्याण पूर्व कैलास नगरमधील घटना

Kalyan Crime News : राहुल गौड याला अटक करण्यात आली असून पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.
Published on

अभिजीत देशमुख

Kalyan News : आईसोबत वाद घातल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणासह त्याच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्व विठ्ठलवाडी कैलास नगर परिसरात घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

आनंद तोमर व राम कनोजिया अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आकाश चव्हाण, साहिल मोरे, तुषार वाल्मिकी, राहुल गौड या हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला. राहुल गौड याला अटक करण्यात आली असून पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

Kalyan News
Mumbai Crime News : व्यावसायिक अपहरण प्रकरणात 3 आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा फरार

 कल्याण पूर्व विठ्ठलवाडी कैलासनगर परिसरात आनंद तोमर हा तरुण राहतो. आनंद रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. याच परिसरात राहणारा आकाश चव्हाण याच्या लहान भावाने आनंदच्या आई सोबत वाद घातला होता. 9 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता सुमारास आनंदने याच परिसरात आकाशला गाठले.

तुझा लहान भाऊ माझ्या आईसोबत वाद का घालतो याचा जाब आकाशला विचारला. संतापलेल्या आकाशने साहिल मोरे उर्फ बिट्ट्या, राहुल गौड, तुषार वाल्मिकी या आपल्या साथीदारांना बोलवून घेतले. या चौघांनी आनंद मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आनंदचा मित्र राम कनोजिया भांडण सोडवण्यास गेला असता साहिल मोरे याने राम याच्या हातावर कोयताने हल्ला केला. त्यानंतर आनंद वर देखील कोयत्याणे हल्ला केला. (Crime News)

Kalyan News
Kalyan News: उल्हास नदीत पोहताना तरुण बुडाला, वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही बुडाला; अग्निशमन दलाकडून शोध सुरु

या हल्ल्यात आनंद व राम दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आकाश चव्हाण, साहिल मोरे, तुषार वाल्मिकी, राहुल गौड या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुल याला अटक करण्यात आली. तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (Latest marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com