NCP NEWS Saamtv
मुंबई/पुणे

Bhiwandi NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का! भिवंडीतील १८ नगरसेवक अपात्र

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीत सामील झालेल्या त्या १८ नगरसेवकांचे पद वाचविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.

Rashmi Puranik

Bhivandi NCP News: भिवंडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहेत. भिवंडीचे माजी महापौर जावेद दळवी यांच्या याचिकेवर नगरविकास विभागाने हा निर्णय दिला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी (Bhivandi) निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश जुगारून काँग्रेसच्या (Congress) १८ नगरसेवकांनी बंडखोरी करत काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार रिषीका रांका यांच्या विरोधात मतदान केले होते. व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

या बंडखोरी विरोधात काँग्रेसने याचिका दाखल केली होती. आता त्याचा निकाल कॉग्रेसच्या बाजूने लागून त्या १८ बंडखोर नगरसेवकांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. शिवाय ३१ डिसेंबर २०२१ पासून पुढील सहा वर्ष निवडणूक लढता येणार नसल्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, भिवंडीत राष्ट्रवादीचा (NCP) एकही नगरसवेक निवडून आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) राष्ट्रवादीत सामील झालेल्या त्या १८ नगरसेवकांचे पद वाचविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र शेवटी त्यांची सदस्यता रद्द झाल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rule Change: १ जुलैपासून एलपीजीच्या नियमात होणार मोठा बदल, या ग्राहकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Monday Horoscope : वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होणार, ५ राशींची चांदीच चांदी होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेची पूजा नेमकी किती वाजता करावी? जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ

Maharashtra News Live Update: सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात जोरदार पाऊस

Crime: बायकोचे शेजारच्यासोबत अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT