Beed News: बीड जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा दणका! बोगस खत विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द

जिल्हा गुण नियंत्रक पथकाच्यावतीने कृषी दुकानांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत.
Beed News
Beed NewsSaamtv
Published On

Beed News: बीडच्या माजलगावमध्ये बोगस खत विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाच्या गुण नियंत्रक पथकाच्या तपासणीत, माजलगावमधील नवा भारत फर्टिलायझर्स लिमिटेड या खत विक्री केंद्र असणाऱ्या दुकानात, हा प्रकार समोर आला आहे. यामुळे या दुकानदाराला जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दणका देत कृषी दुकानाचा परवाना रद्द केला आहे.

Beed News
Wardha News : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी पाच युवक अटकेत, एकाचा शाेध सुरु : एसपी नुरुल हसन

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सद्या सुरू असलेल्या खरीप हंगामात बोगस खते व बियाणांची विक्री होऊ शकते. त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रक पथकाच्यावतीने कृषी दुकानांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत. यादरम्यान माजलगाव (Majalgaon) शहरातील नवा भारत फर्टिलायझर्स लिमिटेड या खत विक्री केंद्राची तपासणी जिल्हा गुण नियंत्रक पथकाकडून करण्यात आली.

या तपासणी दरम्यान केंद्रामध्ये नोंदणी प्रमाणपत्र ठळक व साफ दिसेल, अशा ठिकाणी प्रदर्शित केलेले नव्हते. रासायनिक खतसाठा रजिस्टर तसेच शेतकऱ्यास दिलेले खरेदी बिल सादर केले नव्हते. विक्रीकरिता असलेल्या खतांची बिले ठेवलेली नव्हती. (Beed News)

Beed News
Anil Parab News: मोठी बातमी! अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मारहाण प्रकरणात चार जणांना अटक

दुकानातील साठा रजिस्टर एन फॉर्ममध्ये ठेवलेले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष खतसाठ्याची पडताळणी करता आली नाही. शेतकऱ्यांना पक्की बिले दिल्याचे पथकाला आढळून आले नाही. विशेष म्हणजे विक्री केंद्रामध्ये खत नियंत्रण आदेश 1985 च्या शेड्युलमध्ये समाविष्ट नसलेल्या खताचा ग्रेड विक्रीस ठेवून खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबसाहेब जेजुरकर यांनी या दुकानाचा परवाना रद्द केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com