Pune Lok Sabha Constituency: 10 Candidates From Bjp Willing To Contest From Pune Loksabha Election 2024 says Sanjay Kakde Saam tv
मुंबई/पुणे

Pune Lok Sabha Election: 'पुणे लोकसभेसाठी भाजपकडून १० जण इच्छुक...' संजय काकडेंचा दावा; यादीत कुणा कुणाची नावे?

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. २३ जानेवारी २०२४

Pune Loksabha Election 2024:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभांच्या दृष्टीने मतदार संघांवर दावे- प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता भाजपकडून पुणे लोकसभा लढवण्यास तब्बल १० जण इच्छुक असल्याची माहिती माजी खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. तसेच मी सुद्धा लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचेही काकडे म्हणालेत. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे लोकसभा (Pune Loksabha) लढवण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भाजपकडून १० जण पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले आहे. दहाही तसेच स्वतः संजय काकडेही लोकसभेच्या मैदानात उतरण्यास इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

"पुणे लोकसभेसाठी १० उमेदवार इच्छुक आहेत. दहाही उमेदवार आपापल्या परीने काम करत आहेत. ज्याला पक्षश्रेष्ठी दिल्लीतून उमेदवारी देतील त्याच्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार काम करतील. तसेच विजय हा भारतीय जनता पक्षाचाच होईल," असा दावा संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहेत इच्छुक?

तसेच निवडणूक लढवण्यास मीसुद्धा इच्छुक आहे. मला तयारी करायची गरज नाही सर्व विधानसभा मतदारसंघात माझे कार्यकर्ते आहेत, असेही संजय काकडे म्हणालेत. दरम्यान, पुणे लोकसभा लढण्यासाठी भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वरदा बापट, सुनील देवधर, माधुरी मिसाळ यांची नावे सध्या चर्चेत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drone Terror : मराठवाड्यात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचं गुढ उलगडलं; पोलिसांचा खळबळजनक खुलासा

Gujrat Road Accident: मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

SCROLL FOR NEXT