Kalyan Dombivli Muncipal Corporation Election Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC elections: कल्याण-डोंबिवलीत राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; २ नेत्यांच्या भेटीनं चर्चेला उधाण

Kalyan Dombivli Muncipal Corporation Election News : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार वरूण सरदेसाई आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या भेटीनंतर युतीच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीत ठाकरे गट–मनसे युतीच्या हालचालींना वेग

  • आमदार वरूण सरदेसाई आणि मनसे नेते राजू पाटील यांची भेट

  • केडीएमसी निवडणुकीत युती सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता

  • ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय ताकद वाढणार

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना ठाकरे गटआणि मनसे केडीएमसीची आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढवन्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत लवकरच निर्णय होणार असल्याची महत्त्वाची माहिती ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार वरूण सरदेसाई यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांची भेट घेतली.

यावेळी बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले की, केडीएमसीची निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीने लढवणार आहोत. मनसेला आणि शिवसेनेला मतदान करणारा मोठा वर्ग आहे. ठाकरें बंधूंवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कल्याण–डोंबिवलीत राहतो. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याची ताकद नक्कीच दिसून येईल.

या भेटीनंतर ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी केडीएमसी निवडणुकीत ही युती सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता आमदार वरूण सरदेसाई यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माणिकराव कोकाटे यांना शिक्षाच दिली होती ना? हे जर आधीच झाले असते तर बरे झाले असते, असा टोला सरदेसाई यांनी लगावला. एकूणच, ठाकरे गट–मनसे युतीची घोषणा झाली तर कल्याण–डोंबिवलीतील राजकारण तापणार असून आगामी निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला घाई का? शरद पवार म्हणतात 'शपथविधीची माहिती नाही

Maharashtra Live News Update: डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; दुचाकी चालक जखमी

SCROLL FOR NEXT