Ajit Pawar on BJP saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? अजित पवार राजभवनावर दाखल, राष्ट्रवादीचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार?

Ajit Pawar News : सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ आणि अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस देखील राजभवानावर दाखल झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ आणि अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अजित पवार लवकर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.  (Latest Marathi News)

राष्ट्रवादीतील 40 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. यापैकी 9 आमदार अजित पवारांसोबत शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवारांसह हे 9 आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत. यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचादेखील समावेश आहे. (Political News)

अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीतील काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते अशी माहिती आहे.

या बैठकीतून सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या. त्यानंतर अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन थेट राजभवनात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

अंबानींना मोठा दणका! मुंबईतील 3 हजार कोटीच्या घरावर ईडीची जप्ती; देशात खळबळ

Maharashtra Live News Update: धुळ्यातील लोणखेडी फाट्याजवळ चारचाकी आणि दुचाकीचा अपघात

Haryana: धक्कादायक! सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत IAS अधिकाऱ्याच्या सचिवाने संपवलं जीवन

Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT