Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्या अन् तुरुंगात टाका, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Uddhav Thackeray Demands Gyanesh Kumar Resignation: उद्धव ठाकरे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.

Priya More
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार चर्चेत

  • उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगावर टीका

  • उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली

  • ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन तुरूंगात टाका

  • उद्वव ठाकरे ज्ञानेश कुमारांविरोधात आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच असून त्यांचा तातडीने राजीनामा घ्या आणि त्यांना तुरुंगात टाका.', अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांना एकत्र येण्याचंही आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, 'गेली काही वर्षे आम्ही निवडणूक आयोगाच्या मनमानी विरोधात बोलत आहोत. निवडणूक आयोग आता दोन आयुक्तांचा झालेला आहे. पक्षात मनमानी चालली आहे असे आक्षेप घेऊन गोंधळ घालत आहे. ज्ञानेश कुमार यांचा बिभत्स चेहरा जगासमोर आला आहे. लोकशाहीचा खून आणि पक्ष फोडणे हे काम ही दोन जणांची टोळी काही वर्षांपासून करत आहे.'

उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, 'निवडणूक आयोग गृह मंत्रालयाच्या सूचना मानतो. निवडणूक आयोगाने पहिला आघात आमच्या शिवसेनेवर केला. आम्हाला पहिल्या पोटनिवडणुकीत वेगळ्या चिन्हावर लढायला लावले. आमचे नाव चिन्ह गद्दाराना दिले. राष्ट्रवादीत पण तेच आता तृणमूल काँग्रेसचे देखील तसंच करणार आहेत. याचा अर्थ लोकशाहीचा खून केला जात आहे. महाराष्ट्रात लोकसभेला महाविकास आघाडीला चांगले मतदान झाले.४० लाख मतदार वगळले. अडवाणींचे नाव आता वगळले.'

उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की, 'लोकशाही वाचवली पाहिजे. भाजपमध्ये चांगली लोक आहेत त्यांनी सुद्धा सोबत आले पाहिजे. झेन झी ज्ञानेश कुमार यांच्यावर आक्षेप घेतले आहे. निवडणूक आयोगाचे संधू आणि जोशी यांनी धाडस दाखवले त्यांचे अभिनंदन आहे. जनता रस्त्यावर उतरली तर ती काय करतील याचा अंदाज येणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT