Rohit Pawar, Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : रोहित पवारही कंटाळून अजितदादांसारखाच निर्णय घेतील; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची खळबळजनक पोस्ट

Suraj Chavan on Jayant Patil : आमदार रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कंटाळून अजितदादांसारखा निर्णय घेतील, असा दावा सूरज चव्हाण यांनी केला.

Satish Daud

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी अहमदनगरमध्ये वर्धापनदिन साजरा केला. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी जयंत पाटील यांनी भाषण करताना मी आणखी ४ महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन. नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असे सूचक वक्तव्य केलं. यावरून सूरज चव्हाण यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपल्या X अकाउंटवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये ते म्हणतात, "मागच्या वर्षी पक्षाच्या वर्धापनदिनी अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेते सोडून पक्षाची जबाबदारी मागितली होती. परंतु त्यांना ती दिली नाही".

ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली. त्या त्या वेळी जयंत पाटील यांनी ती वेळ मारून नेली. कालच्या अहमदनगरच्या सभेत सुद्धा जयंत पाटील यांनी तेच केलं. विधानसभेपर्यंत प्रदेश अध्यक्ष पद राहू द्यावं असं ते जाहीर भाषणात म्हणाले. जयंत पाटील साहेब गट वाढवण्याला महत्व देतात".

"त्यामुळे तिथे अनेक लोकांची इच्छा आहे की पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळावी. पण कालही जयंत पाटील यांनी वेळ मारून नेली. यामुळे अनेक दिवसापासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कंटाळून अजित दादा सारखा निर्णय घेतील", असा दावाही चव्हाण यांनी केला.

पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन पार पडला. शरद पवार यांच्या पक्षाने अहमदनगरमध्ये तर अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत वर्धापनदिन साजरा केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांचा आदर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT