Maharashtra Political News Shiv Sena Sanjay Raut advice to BJP Pankaja Munde  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Pankaja Munde: परिणाम काय होतील, याची पर्वा न करता निर्णय घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला

Sanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut On Pankaja Munde: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे. आज गोपीनाथराव मुंडे असते, तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्यामुळे राजकीय कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्याचबरोबर राऊतांनी पंकजा मुंडे यांना सल्लाही दिला. त्याचबरोबर राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा देखील साधला.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, महादेवराव शिवणकर अशा बहुजन समाजातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपा शून्यातून उभा केला. शिवसेनेशी युती करून हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे परिवाराचं राजकारणात अस्तित्व राहू नये, यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं .

"...तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील"

"पंकजा मुंडे (Pankaja Munde) गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही. आज गोपीनाथराव मुंडे असते, तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्यामुळे राजकीय कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील", असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची काल जयंती होती. त्यानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून काल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील हजेर होते. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

मला लोक म्हणतात पक्ष माझा. पण मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पक्ष खूप मोठा आहे. आम्हाला काहीच नाही मिळालं तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला, असं पंकजा मुंडे म्हणाला. त्याचबरोबर रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं तर मी भावाच्या घरी जाईन, असंही पंकजा यांनी म्हटलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

Maharashtra Live News Update : नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस

Bollywood Divorce: बॉलीवूडमधील सगळ्यात महागडे घटस्फोट, पोटगी जाणून व्हाल थक्क

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

SCROLL FOR NEXT