Milind narvekar  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : मिलिंद नार्वेकर यांना सभागृहात यायची घाई झाली; संजय शिरसाट असे का म्हणाले?

मिलिंद नार्वेकर यांच्या कृत्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मोठं राजकीय वृ्त्त हाती आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे आमदार नसताना देखील सभागृहात बसल्याचा प्रकार समोर आला. मात्र, नंतर त्यांच्या चूक लक्षात आल्यावर ते उठून गेले. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मिलिंद नार्वेकर यांच्या कृत्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर भाष्य केलं. 'मिलिंद नार्वेकर यांना सभागृहात यायची घाई झाली आहे. उद्धव ठाकरे हे देखील त्यांना जवळ करत नाही. नार्वेकर आमच्या संपर्कात आहे. त्यांचा आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आमच्याकडे किती इनकमिंग आहे, हे कळेल'.

नेमकं काय घडलं ?

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल होत आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी हजर झाले.

त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) होते. नार्वेकर हे देखील त्यांच्यसोबत सभागृहात आले. त्यानंतर नार्वेकर हे सदस्यांच्या बाकावर बसले. मात्र नंतर चूक लक्षात आल्यावर ते उठून गेले. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर ?

मिलिंद नार्वेकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या एकदम जवळची व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. विशेषतः उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर हे त्यांच्या सावली सारखे मागे असतात. नार्वेकर हे ठाकरे गटाच्या पक्षाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

SCROLL FOR NEXT