chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

शिंदे गटाला विलीन व्हावंच लागणार? शिवसेनेचे वकील कोर्टात काय म्हणाले? वाचा...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? यावरून सध्या राजकीय लढाई सुरू आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेल्याने आज याबाबतची सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचे वकील आणि शिंदे गटाचे वकील सध्या कोर्टात युक्तीवाद करत आहे. सरन्यायायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी होत आहे. दरम्यान, शिंदे गटाकडे (Eknath Shinde) विलिनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचा युक्तीवाद शिवसेनेच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात केलाय. (Eknath Shinde Latest News)

शिंदे गटाकडे विलीन होणे हा एकमेव मार्ग असून ते याचा अवलंब करत नाही आहेत. पक्षांतरविरोधी कायद्याचा वापर केला जात नसल्याचं उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करणारे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. फक्त सरकार चालवणं नाही तर, निवडणूक आयोगाकडे जाऊन हे सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. केवळ बहुमत आहे म्हणून वैधता पात्र होत नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे.

शिवसेना नेमकी कुणाची या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी युक्तीवाद करत आहेत. तर शिंदे गटाकडून गटाकडून सुद्धा युक्तीवाद करत आहेत. सुप्रीम कोर्टाने यावेळी दोन्ही बाजूंना पूर्ण वेळ देण्यात आल्याचं नमूद केलं आहे. (Shivsena Latest News)

'आजही उद्धव ठाकरेंचा पक्षाचे अध्यक्ष मानलं जातं'

गुवाहाटीत जाऊन तुम्ही आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही. निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षासंबंधी निर्णय घेतला जातो. गुवाहाटीत बसून तुम्ही हे जाहीर करु शकत नाही. आपल्याकडे बहुमत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण दहाव्या सूचीत यासाठी मान्यता नाही. कोणतीही फूट ही दहाव्या सूचीचं उल्लंघन आहे. आजही उद्धव ठाकरे यांनाच पक्षाचे अध्यक्ष मानलं जात आहे. याचिकेतही तसा उल्लेख आहे असं कपिल सिब्बल यांना निदर्शनास आणून दिलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

SCROLL FOR NEXT