Sanjay Raut Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: 'धनुष्यबाणाच्या चोरांना…’ संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले; संशयित चोर...

धनुष्य बाणाच्या चोरांना देखील राज्याची जनता रस्त्यावर पकडून धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Political Crisis: निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या निर्णयानंतर आज खासदार संजय राऊत यांनी कोकणातून परतताच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार संजय राऊत हे कालपासून कोकणात होते. या निर्णयानंतर ते आज तातडीने मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची (Udhav Thackeray) भेट घेतली. य भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत..

यावेळी बोलताना "शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. ते चोर कोण आहेत? अलिकडच्या काळात महाराष्ट्रात मंदिरांवर दरोडे पडत आहेत. मंदिरांचे सोन्याचे कळस चोरी होत आहेत. मूर्त्या चोरीला जात आहेत. त्याचपद्धतीने आमच्या मंदिरातला शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण चोरीला गेला”, असं संजय राऊत म्हणाले.

त्याचबरोबर "या चोरीसाठी दिल्लीतल्या एखाद्या महाशक्तीने काय मदती केली याचा आम्ही तपास करतो. पण लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, धनुष्यबाणाची चोरी झालेली असून संशयित चोर कोण आहे याबद्दल लवकरच माहिती देऊ," असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, "धनुष्य बाणाच्या चोरांना देखील राज्याची जनता रस्त्यावर पकडून धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat-Anushka: विराट आणि अनुष्काचे अनसीन रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

SCROLL FOR NEXT