Shiv Sena : मोठी बातमी! शिवसेनेच्या सर्व कार्यलयांवर शिंदे गट दावा करणार? पक्षाचं अकाऊंटही ताब्यात घेणार?

Eknath Shinde: शिवसेना पक्षाची राज्यभरात असलेल्या कार्यालयांवर शिंदे गट दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Shiv Sena Shinde group
Shiv Sena Shinde group saam tv
Published On

Shiv Sena : शिवसना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवल्यानंतर शिंदे गट आता आणखी आक्रमक होणार आहे. शिवसेना पक्षाची राज्यभरात असलेल्या कार्यालयांवर शिंदे गट दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एवढंच नाही तर शिवसेनेचं गाणं आणि ट्विटर, फेसबूकसह सर्व डिजिटल अकांउंटवर देखील शिंदे गट दावा करणार आहे. शिवसेना पक्षाच्या नावावर राज्यभरात जे काही आहे त्याच्यावर शिंदे गट टप्प्या टप्प्याने दावा सांगणार आहे. साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Shiv Sena Shinde group
Pune: पुण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; जोरदार राडा, पोलिस घटनास्थळी दाखल

प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालय, विधीमंडळ पक्षाचे कार्यालय, लोकसभेत असलेले कार्यालय या सर्वांवर शिंदे गट आता दावा करणार आहे. शिवसेनेचा शिंदे गटच मुळ पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाचे पत्राचा यासाठी वापर केला जाईल. (SHIV SENA)

शिवसेना पक्ष मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार अधिकृतपणे आले आहेत. हे सर्व अधिकार एकनाथ शिंदे टप्प्या टप्प्याने मिळवणार आहेत. मात्र जी मालमत्ता वेगवेगळ्या ट्रस्टच्या नावावर आहे, ती शिंदे गटाला मिळणार नाही. मुंबईतील शिवसेना भवन हे ट्रस्टच्या नावार आहे. त्यामुळे ते शिंदे गटाला मिळणार नाही. मात्र इतर ठिकाणी असलेल्या कार्यालयाचा शिंदे गट ताबा मिळवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Shiv Sena Shinde group
Video : उद्धव ठाकरेंचे भाषण पाहून शिवसैनिकांना झाली बाळासाहेबांची आठवण; भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

शिवसेना पक्षाचे जे अधिकृत अकाऊंट आहे, ज्यातून पक्ष चालवण्यासाठी निधी वापरला जातो त्या अकाउंटवर देखील शिंदे गट दावा करणार आहे. परंतु त्याआधीच ठाकरे गटाने शिवसेनेच्या खात्यातील कोट्यवधीचा निधी वेगळ्या खात्यात वळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com