Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis : आता फक्त ४८ तास..., भाजप नेत्याचं सूचक ट्विट

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सूचक ट्विट केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या 8 दिवसांपासून एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, आज दुपारपर्यंत त्यांनी गुवाहाटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गोष्टीसाठी बंडखोरांनी एवढं महानाट्य घडवून आणलं, ती सत्तास्थापनेची वेळ जवळ आली आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत चाचणीस सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सूचक ट्विट केलं आहे. आता फक्त ४८ तास... असं भातखळकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Eknath Shinde latest News)

राज्यात राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. राज्यापालांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. उद्या बहुमत सिद्ध करावे असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

राज्यपालांच्या पत्राला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या कारवाईवर दोन आठवड्यांचा वेळ दिला आणि बहुमत चाचणीला २४ तासांचा वेळ दिला, यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ही याचिका जेव्हा लिस्टेड होणार तेव्हा ही याचिका घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे आम्ही उद्याच्या बहुमत चाचणीत सहभागी होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी मुंबईत उद्या दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांचा मुक्काम कुठे असेल याबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण सांगण्यास नकार दिला आहे, मात्र या आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण मुंबई, ठाणे, सुरत, आणि गोवा या चार ठिकाणांपैकी एक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात लवकरच आता भाजपचे सरकार येणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आता फक्त 48 तासं अशा स्वरूपाचं ट्विट केल्यानं लवकरच महाविकास आघाडी सरकार कोसळेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT