Maharashtra Political Crisis| Vijay Shivs 
मुंबई/पुणे

'भाजपसोबत सरकार बनवा, दुसरा पर्याय नाही; त्याशिवाय भविष्य नाही'

'५६ वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधण्याच काम संजय राऊत यांनी केलं आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे : 'भाजपसोबत सरकार बनवा, दुसरा पर्याय नाही; त्याशिवाय भविष्य नाही' असं वक्तव्य शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केलं आहे. ते आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचे सांगितलं. शिवाय ५६ वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधण्याच काम संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्याचा आरोप राऊतांवर केला.

ते म्हणाले, ' काल मी सर्व मीडियाला पत्र पाठवले होते. शिवसेनेचा मी माजी मंत्री, नेता म्हणून आज बोलणार आहे. तसं पत्र काल काढले होते. भूमिका जाहीर केलेली आहेच, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ५० आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले आहेत. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं आहे की, महाविकास आघाडीमधून बाहेर पडून हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या आपला मित्र पक्ष भाजपसोबत जावे असं शिवतारे म्हणाले.

हे देखील पाहा -

एखाद्या आमदाराला मंत्री होण्यासाठी ३० वर्षे घालवावी लागतात. २०१९ मध्ये अनेकजण पडले. ९० लाखामधील ४६ लाख मतदान शिवसेना आमदारांनी घेतलं आणि ५२ आमदार निवडून आले. १०० टक्के बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सज्जन माणूस सगळ्याशी घरोब्याशी संबंध आहेत. त्यामुळे आम्ही एक ठराव देणार आहोत. गेले काही दिवस जे चालले आहे, या चक्रव्यूहात का अडकले आहेत कळत नाही.

मी कट्टर शिवसैनिक आहे. मी कधी काँग्रेस राष्ट्रवादीशी जवळीक केली नव्हती. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्यावा असा पुनरुच्चार त्यांनी केला.

राष्ट्रवादीची ढवळाढवळ -

शिवाय पुरंदर येथील विमानतळाच्या सर्व परवानगी घेतल्या एवढा मोठा प्रकल्पाचा फायदा होणार होता. सगळं झालं होतं सर्व्हे झाले होते. ५७ लाख खर्च केला, इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी योग्य जागा होती. मात्र, दुदैवाने शेतकऱ्यांचा विरोध आहे असं सांगण्यात आलं, समृद्धी महामार्गावर अनेक शेतकऱ्यांच कल्याण झालं होतं तसे इकडे पण झालं असत पण फक्त विरोध आहे असं दाखवण्यात आला. यात अनेकदा राष्ट्रवादीने ढवळा ढवळ करण्याचा प्रयत्न केला.

गुंजवणी धरणाबाबत अनेक आंदोलन केली. मंत्री झाल्यावर निधी आला पण महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये ठराव केला की १३१३ कोटी पाईपलाईन पूर्ण होत नाही. तोपर्यंत ६० टक्के पाणी बारामतीला दिलं. यावेळी मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारलं देखील नाही. प्रचंड अन्याय झाला आणि तो आमच्यावर महाविकास आघाडीने केला आहे.

दरम्यान, पुण्याला बाजार समिती हवी फडणवीस सरकारने ती मान्य देखील केली. पण या महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आणि आता थेऊरला घेऊन जाण्याचा घाट राष्ट्रवादीचा आहे. पुण्याच्या कचरा डेपोबाबत भांडलो पाणी सोर्स यामुळे खराब झाले. संघटनेला अडचणी होऊ नये काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच सरकार सोडा आणि भाजपसोबत सरकार बनवा, दुसरं भविष्य नाही दुसरा पर्याय दिसत नाही त्यामुळे शिंदे सोबत जाणार असल्याचं त्यांनी पुन्हा सांगितलं.

शिवसेनेचा खरा शत्रू कोण आहे ओळखलं पाहिजे. पुरंदर हवेलीतील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली संपूर्ण तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य आणि २००० कार्यकर्ते बैठकिला उपस्थित होते आणि ते माझ्यासोबत आहेत. तुमचे नेते कोण विचारले असते जे ५१ आमदाराच मत आहे, तेच माझं ही मत आहे. आढळराव पाटील यांच्याशी बोललो. सचिन अहिरे यांच्या नेतृत्वाखाली जी सभा झाली त्यात मी उघडपणे सांगितलं की, काँग्रेस राष्ट्रवादी सोडा आपलं त्यात भल नाही. ५६ वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधण्याच काम संजय राऊत यांनी केलं असा आरोपही त्यांनी यावेळी राऊतांवर केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निश्चितच मी विजय होईल- झिशान सिद्दीकी

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT