Maharashtra Political Crisis Eknath shinde Devendra fadnavis government won't last long climax deputy speaker narhari zirwal Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटात आनंदी आनंद, पण झिरवळांनी एका वाक्यात हवाच काढली

Supreme Court Hearing On Shivsena MLA: माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक मोठा दावा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Supreme Court Hearing On Shivsena MLA: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय दिला. कोर्टाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून शिंदे गटासाठी दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं शिंदे गटाकडून पेढे वाटून स्वागत केलं जात आहे. अशातच माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक मोठा दावा केला आहे. (Breaking Marathi News)

शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र हे प्रकरण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे येईल असं वाटत असताना हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे नार्वेकर हे काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मात्र, असं असलं तरी नरहरी झिरवळ यांना शिंदे सरकार फार काळ राहणार नाही असं अजूनही वाटत आहे. शिंदे- फडणवीस सरकार अजूनही टांगणीला आहे, अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी व्यक्त केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

काय म्हणाले नरहरी झिरवळ?

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्यपालांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यावर चर्चा होणार आहे.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्या १६ आमदारांपैकी एक आहेत. त्यामुळे हे सरकार अजूनही टांगणीवर आहे, असं नरहरी झिरवळ म्हणाले.

गटनेता, प्रतोद त्याची नियुक्ती चुकीची होती. त्याच बेसवर मी हे आमदार अपात्र ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाचे क्लिअर कट निर्णय आहे. व्हीप बजवायला भरत गोगावले अपात्र आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे गटनेतेपदावरही संशय निर्माण होतो, असं झिरवळ यांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

SCROLL FOR NEXT