Shivsena Bhavan Dadar Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: मोठी बातमी! ठाकरेंच्या हातून सेना भवनही जाणार? शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार दाखल

एखाद्या ट्रस्टच्या वास्तूचा राजकीय पक्षाला कसा काय वापर करु दिला जावू शकतो, असेया याचिकेत म्हणले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shivsena Bhavan: शिवसेना नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेनेचा ताबा शिंदेंकडे गेल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखा तसेच कार्यालये ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

यानंतर शिवसेना भवनाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच याबद्दलची महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे. शिवाई ट्रस्टविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर शिवसेना भवन कोणाच्या ताब्यात जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना भवन हे पक्षाच्या मालकीचे नसून ते शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. मात्र आता या ट्रस्टविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यशस लीगल फर्मकडून धर्मादाय आयुक्तांकडं तक्रार दाखल करण्यात आली असून एखाद्या ट्रस्टच्या वास्तूचा राजकीय पक्षाला कसा काय वापर करु दिला जावू शकतो, असे योगेश देशपांडे यांनी या याचिकेत म्हणले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षांचं प्रकरण ७ न्यायाधीशांकडे सोपवायचं की ५ न्यायाधीशांकडे ठेवायचं याचा निर्णय मेरिटनुसार घेतला जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत घेतला होता. आता उद्यापासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.(Udhav Thackeray)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Maharashtra Live News Update: पुण्यात मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

SCROLL FOR NEXT