SRPF Recruitment Exam Saam Tv
मुंबई/पुणे

SRPF Recruitment Exam: पोलिस भरतीत मोठा घोटाळा, परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील ८५ प्रश्न जसेच्या तसे

Police Recruitment Exam Scam: महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत एसआरपीएफ गट 5 दौंड लेखी परीक्षेत गोंधळ झाल्याची घटना घडली. या परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील ८५ प्रश्न जसेच्या तसे आले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

Priya More

Summary -

  • एसआरपीएफ गट 5 दौंड लेखी परीक्षेवरून मोठा वाद

  • ८५ प्रश्न खासगी पुस्तकातून आल्याचा आरोप

  • ही परीक्षा रद्द करण्याची मागणी

  • परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे

अक्षय बडवे, पुणे

महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत एसआरपीएफ गट 5 दौंड लेखी परीक्षेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आले आहेत. परीक्षामध्ये स्वतः तज्ज्ञाने प्रश्न काढणे अपेक्षित असताना एका पुस्तकातले तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आले आहेत. एकाच प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील प्रश्न पोलिस दलाने घेतलेच कसे असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. यासंदर्भात विद्यार्थी संघटनाकडून या परीक्षेसंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार आणि सुप्रिया सुळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

पोलिस भरती परीक्षा परत घ्या -

राज्य राखीव पोलिस दलाच्या २ मे रोजी झालेल्या परीक्षेमध्ये एका खासगी कोचिंग क्लासेसच्या सराव प्रश्न संच्यातील तब्बल ८५ प्रश्न विचारले गेले असल्याचे निदर्शनात येत आहे ही फार गंभीर बाब आहे. प्रश्नपत्रिका तयार करत असताना इतर प्रकाशनातील, पुस्तकातील प्रश्न तर नाहीत ना याची माहिती घेतली गेली पाहिजे होती. पण याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. यामुळे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांवर अन्याय होतं आहे. ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली.

आम्ही चौकशीसाठी तयार आहोत -

आम्ही कुठल्याही चौकशीसाठी तयार आहोत. आमचा या प्रकरणाशी कुठलाही थेट संबंध नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र पब्लिकेशनचे संपादक ज्ञानेश्वर बांगर यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीअंतर्गत एसआरपीएफ गट ५ या लेखी परीक्षेत एकाच पुस्तकातून १०० पैकी ८५ प्रश्न आल्याने एकच खळबळ उडाली. 'पोलिस भरती २०२६, ५० प्रश्नपत्रिका संच' असे या पुस्तकाचे नाव असून विठ्ठल बडे या पुस्तकाचे लेखक आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही अनेक ग्रंथ बनवतो. याआधी सुद्धा आमच्या पुस्तकातले अनेक प्रश्न पोलिस भरतीच्या विविध पेपरमधून विद्यार्थ्यांसमोर आले होते. आता एकाच पुस्तकातून ८५ प्रश्न जर येत असतील तर त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचे प्रकाशकांनी स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणाची चौकशी करा -

एसआरपीएफ पोलिस भरतीमध्ये ८० पेक्षा जास्त प्रश्न हे खासगी प्रकाशकामधून घेण्यात आले. विद्यार्थी वर्षानुवर्षे पोलिस भरतीची तयारी करत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. वर्षानुवर्षे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. मात्र त्या खासगी पब्लिकेशन शाखामधील त्या ठिकाणी प्रश्न बनवण्यासाठी होतं का? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा एक प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT