Maharashtra Police Bharti Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Police Bharti : पोलीस भरतीच्या जाहिरातीत त्रुटी...अर्ज स्वीकारला जात नसल्याने अर्जदारांना फटका; या संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

Sandeep Gawade

अभिजीत देशमुख

Maharashtra Police Bharti 2024

राज्य शासनाने मेगा पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाखों तरुण तरुणी पोलीस भरतीसाठी अर्ज करत असताना या अर्जातील त्रुटीचा फटका अनुसूचित जाती जमातीच्या तरुणींना बसला आहे. क्रिमिलेयर प्रमाणपत्र बंधनकारक नसल्याचे स्पष्ट निर्देश असतानाही अर्जात हा रकाना भरणे बंधनकारक करण्यात आल्याने या तरुणींचा ऑनलाइन अर्ज स्वीकारला जात नसल्याचे समोर आले आहे . यामुळे जात प्रमाणपत्र असतानाही या तरुणींना खुल्या गटातून अर्ज करावा लागत आहे .

याप्रकरणी भीमशक्तीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाकडे तक्रार केली असून शासनाकडून या त्रुटी मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र त्रुटी मान्य करण्यापेक्षा त्यात तातडीने दुरुस्ती करत या तरुणींना त्यांचा हक्क देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाकडून पोलीस भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अनुसूचित जाती जमातीच्या तरुणींना क्रिमिलेयर प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन अर्ज भरताना क्रीमिलेयर प्रमाणपत्राचा जावक क्रमांक आणि दिनांक भरल्या खेरीज अर्ज स्वीकारला जात नसल्याने अनुसूचित जाती जमातीच्या तरुणींचा ३० टक्के आरक्षणाचा लाभ हिरावला जात आहे. या तरुणींना खुल्या गटातून अर्ज करावा लागत असून नोकरीच्या आशेने शेकडो तरुणीनी खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केले आहेत.

मात्र अशा प्रकारे सदोष जाहिरात काढून राज्य शासन अनुसूचित जाती जमातीच्या तरुणीचा नोकरीचा हक्क हिरावत असल्याने याप्रकरणी भीमशक्तीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भीमशक्तीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश वाघमारे यांनी याप्रकरणी गृहविभागाकडे तक्रार केली असून गृह विभागाने ही तक्रार वैध असल्याचे मान्य करत यात सुधारणा करण्याचे आश्वासन वाघमारे याना दिले आहे. मात्र जाहिरात प्रसिद्ध होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापी अर्जात दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने समाजातील गरजू तरुणीचा नोकरीचा अधिकार हिरावला गेल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीमशक्तीच्या वतीने त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Eating Garlic: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे; वाचून व्हाल थक्क

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Mumbai Indians: रोहित शर्मा पलटणची साथ सोडणार? मुंबई इंडियन्स या खेळाडूंना करणार रिटेन

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी टाळ मृदुंगाच्या निनाद आणि भक्तीरसात तल्लीन

Sugar Apple : सिताफळ आईस्क्रिम कशी बनवतात माहितीये?

SCROLL FOR NEXT