Government Job
Government Job Saam TV
मुंबई/पुणे

Government Job : विद्यार्थ्यांना मोठा धक्का! जिल्हा परिषदेपाठोपाठ आणखी एका विभागातील भरती प्रक्रिया रद्द

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकीकडे राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली असतानाच, दुसरीकडे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पशुसंवर्धन विभागाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

विशेष बाब म्हणजे, याआधी सुद्धा राज्य सरकारने १३ हजार ५२१ पदांची जिल्हा परिषदेची भरती रद्द केली होती. त्यापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागाची भरती रद्द करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

२०१७ आणि २०१९ मध्ये राज्यात पशुसंवर्धन (Jobs) विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. पशुसंवर्धन आयुक्तलांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतआधी २०१७ आणि नंतर मार्च २०१९ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

पशुवसंर्धन विभागातील ७२३ पदांसाठी ही जाहीरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान, पैसे भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले होते. गेल्या चार वर्षांपासून या भरतीप्रक्रियाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाने ही भरतीही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT