Phone tapping Case Saam tv
मुंबई/पुणे

Phone tapping Case: गुन्हा खरा पण आरोपी सापडत नाही, सीबीआयचा खुलासा; विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

फोन टॅपिंग प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस सरकावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र अशाप्रकारे तपास बंद केल्यामुळे सीबीआयवर टीकेची झोड उठवली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Phone tapping Case News:

गोपनीय कागदपत्र लीक आणि फोन टॅपिंग प्रकरणातला गुन्हा तर खरा आहे. मात्र आरोपी सापडत नाही म्हणून तपास बंद करण्याची नामुष्की देशातील आघाडीची तपास यंत्रणा म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागावर आली आहे. या फोन टॅपिंग प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस सरकावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र अशाप्रकारे तपास बंद केल्यामुळे सीबीआयवर टीकेची झोड उठवली आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

2021 साली दाखल झालेला गोपनीय कागदपत्र लिक आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा गुन्हा तर खरा आहे. पण आरोपी सापडत नाही हे म्हणतय कोण तर खुद्द देशातील आघाडीची तपासणी तपास यंत्रणा सीबीआय.

वर्षभराच्या तपासात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयातील गोपनीय कागदपत्रे आणि फोन टॅपिंग संदर्भातली माहिती लीक झाली कशी, कोणी केली याचा साधा पत्ता सीबीआयला लावता आलेला नाही.

महाविकास आघाडीचे सरकार असताना हे प्रकरण चांगलच गाजलं होत दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले गेले होते. मात्र अशा प्रकारे तपास अपूर्ण असतानाच बंद करण्यात आल्याने विरोधी पक्षांनी यावेळी थेट CBI वर निशाणा साधला आहे.

मार्च 2021 साली तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

आपल्या दाव्यांना सिध्द करण्यासाठी त्यांनी तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव जयस्वाल यांना लिहिलेल्या एका पत्राचा हवाला दिला होता आणि दलालांमार्फत बदली रॅकेट सुरू आहे, असं सांगत एक पेन ड्राईव्ह देखील समोर आणला होता.

जे पत्र फडणवीसांनी समोर आणलं होतं ते गोपनी असल्याचा दावा करत हे पत्र लिक झालंच कसं असा सवाल उपस्थित करत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आणि चौकशीला सुरुवात झाली.

याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील नोंदवला गेला, मात्र तेव्हा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला यश आला नाही. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला आणि गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. आता सीआयडीच्या ऑफिसमधील कॉम्प्युटर हॅक करून कागदपत्रे लीक झाल्याचं सीबीआय म्हणत आहे .

गुन्हा तर खरा आहे पण आरोपी सापडत नाही असा दावा सीबीआयने केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हा जर खर आहे तर कागदपत्रे नेमके लीक केली कोणी, ते फडणवीसांकडे पोहचली कशी लीक करण्यामागचा उद्देश काय होता, हे तर प्रश्न आहेतच. पण असा गुन्हा जो खरा तर आहे पण केवळ आरोपी निष्पन्न होत नाही म्हणून बंद करण्याची घाई सीबीआयने एवढ्या लवकर का करावी हा देखील प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

SCROLL FOR NEXT