Padalkar Vs Awhad Saam Tv
मुंबई/पुणे

Padalkar Vs Awhad: पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार हाणामारी; पाहा VIDEO

Maharashtra Politics: गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा वाद विकोपाला गेला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले. एकमेकांना त्यांनी मारहाण केली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

पावसाळी अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आमने-सामने आले. विधानभवनातील पायऱ्यांजवळ दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कॉलर पकडून त्यांनी एकमेकांना मारहाण केली आली. विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर हा राडा झाला. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

काय घडलं पडळकरांना ठाऊकच नाही!

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद टोकाला गेला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अगदी कपडे फाटेपर्यंत ही हाणामारी झाली होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पडळकर यांना विचारणा केली असता, त्यांनी उत्तर देणं टाळलं. आम्ही गेटवर होतो, काय घडलं माहीत नाही, असं वरवरचं उत्तर पडळकरांनी यावेळी दिलं.

विधानसभेत गुंडांना प्रवेश -

जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला. पळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, 'जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करत असतील तर आम्हीच सुरक्षित नाहीत. विधानभवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? ', असा संताप त्यांनी व्यक्त केला.

बुधवारी विधानसभेच्या गेटसमोर गोपीचंद पडकर आणि जितेंद्र आव्हाड आमने-सामने आले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केला होता. गोपीचंद पडळकर विधासभेत कारने येत होते तेव्हा त्यांनी आपल्या कारच्या दरवाजाला आतून लाथ मारली. तेव्हा कारचा दरवाजा जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लागला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला आणि त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली याचा व्हिडीओ समोर आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT