maharashtra legislative session
maharashtra legislative session Saam Tv
मुंबई/पुणे

१८ जुलैपासून सुरू होणारे अधिवेशन पुढे ढकलले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सोमवार १८ जुलैपासून होणारे विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केले आहे. याबाबतचे पत्र सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल असंही यामध्ये म्हटले आहे.

maharashtra legislative session

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख २०२२ च्या प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार १८ जुलै २०२२ पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. पण संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं विधिमंडळाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

Bachchu Kadu Sangali Speech |"जात-धर्माशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही", बच्चू कडू बरसले!

Aditya Thackrey Full Speech Chiplun : भाजपला 200 पार करणे मुश्कील! आदित्य ठाकरेंचा मोठा दावा..

SCROLL FOR NEXT