maharashtra new governor c p radhakrishnan Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?, जाणून घ्या एका क्लिकवर सर्वकाही

C P Radhakrishnan: सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबत घोषणा केली आहे.

Priya More

महाराष्ट्राला नवे राज्यपाल (Maharashtra Governor) मिळाले आहेत. सी पी राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस राज्यपाल पदाची धुरा राधाकृष्णन यांच्या हाती सोपवणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबत घोषणा केली आहे. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल राष्ट्रपती भवनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले.

राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नवीन राज्यपालांची नावं जाहीर करण्यात आली. सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याचे जाहीर करण्यात आले. लवकरच सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारतील. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल आहेत. आता झारखंडच्या राज्यपालपदी संतोषकुमार गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि झारखंडचे माजी राज्यपाल आहेत. राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये झाला. मदुराई विद्यापीठामधून त्यांनी बीबीएचं शिक्षण पूर्ण केलं होतं. यासोबत त्यांनी राज्यशास्त्रात पीएचडी देखील केली आहे. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यामध्ये राधाकृष्णन यांचा मोलाचा वाटा आहे.

१६ व्या वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत आहेत. १७ व्या वर्षांपासून ते भारतीय जनसंघाचे देखील सदस्य होते. भाजपच्या तिकिटावर राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या होत्या. २००४,२०१२ आणि २०१९ मध्ये या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सी पी राधाकृष्णन हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून संसदेत गेले होते. २००४ ते २००७ दरम्यान तामिळनाडूमध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: आजी जोमात बाकी कोमात, अस्सल डान्सरसोबत जुगलबंदी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एकदम कडक!

Dhananjay Mahadik: 'लाडक्या बहि‍णी'बद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण, काय म्हणाले धनंजय महाडिक...

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

Manoj Jarange News : कोणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे? मनोज जरांगे आज फैसला सांगणार!

SCROLL FOR NEXT