Maharashtra-Karnataka border dispute
Maharashtra-Karnataka border dispute saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचे मुंबईत पडसाद; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासलं

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Maharashtra-Karnataka border dispute in mumbai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता मुंबईत देखील उमटले आहेत. मुंबईत कर्नाटक सरकारच्या पोस्टरला काळं फासल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंग यांच्या पोस्टरला देखील काळ फासण्यात आले आहे. (Latest Marathi News)

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संगलीमधील जत नंतर सोलापूर-अक्कलकोटवर दावा केल्यामुळे त्याचे राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील माहिम विभागातील बसस्थानकावर कर्नाटक सरकारच्या पोस्टरला काळं फासण्याचा प्रकार समोर आला आहे.

काळ फासण्यात आलेले पोस्टर हे कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे होते. या पोस्टरवरील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंग यांच्या फोटोला देखील काळं फासण्यात आले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर वक्तव्य केल्यानंतर शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरात कर्नाटक परिवहन विभागाच्या एसटी बसेस थांबविल्या

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू असतानाच आज कर्नाटक परिसरात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोल्हापुरात येणाऱ्या कर्नाटक परिवहन विभागाच्या एसटी बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत. कोल्हापुरातील एसटी बस डेपो परिसरात उभ्या असलेल्या कर्नाटक परिवहन विभागाच्या बसेसवर 'जय महाराष्ट्र' असं लिहीत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे .तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आलेला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत आल्यावर 'त्या' पोलिसांवर कारवाई करणार; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT