MNS-Shivsena Alliance: Saam Tv
मुंबई/पुणे

MNS-Shivsena Alliance: ऐतिहासिक क्षण! २० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

Raj thackeray and Uddhav Thackeray Announce Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज युतीची अधिकृत घोषणा केली. युतीची घोषणा होताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Priya More

Summary:

  • अखेर मनसे-शिवसेना युतीची आज अधिकृत घोषणा करण्यात आली

  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत केली घोषणा

  • ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनंतर एकत्र

  • दोन्ही ठाकरे कुटुंब आणि पक्ष एकत्र आल्यामुळे नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण

महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आज पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आज युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधू एकत्र आले. ही निवडणूक ठाकरे बंधू एकत्रित लढवणार आहेत. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र आल्या. ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा करताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये राज- ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आज युतीची घोषणा केली. यावेळी मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूच्या खुर्चीवर संजय राऊत बसले होते. युतीची घोषणा केल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित येत फोटो देखील काढले. हा आनंदचा क्षण पाहून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या डोळ्यात अश्रू आले. युतीची घोषणा होताच शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दादरच्या शिवाजीपार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. ठाकरे बंधूंना आणि कुटुंबीयांना एकत्रित पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. ठाकरे बंधूं युतीची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आनंद व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद

SCROLL FOR NEXT