महाराष्ट्र पोलीसांकडे Drone Attack पासून वाचण्यासाठी यंत्रणाच नाही.
महाराष्ट्र पोलीसांकडे Drone Attack पासून वाचण्यासाठी यंत्रणाच नाही. Saam News Digital
मुंबई/पुणे

Drone Attack: मुंबई-महाराष्ट्रावर 'ड्रोन हल्ला' झाला तर काय? राज्यात ड्रोनविरोधी यंत्रणाच नाही

सूरज सावंत

मुंबई: जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील कानाचक परिसरातील संधवन येथे गावकऱ्यांनी ड्रोन स्पॉटिंगचा संशय व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीर पोलीसांनी या अज्ञात ड्रोनचा शोध सुरू केला आहे. हे झालं सीमावर्ती भागात. पण असंच जर राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai) घडलं तर? महाराष्ट्र (Maharashtra) अथवा मुंबईत कुठेही ड्रोन हल्ला (Drone Attack) झाला तर काय? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे स्वतः महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आता याबाबच चिंता व्यक्त करतायत. (What if there is a drone attack on Mumbai-Maharashtra? There is no anti-drone system in the state)

हे देखील पहा -

आधुनिक काळात आता युद्धही आधुनिक पद्धतीने लढलं जातं. ज्या ड्रोनने फोटोग्राफी, व्हिडिग्राफी, अन्न - औषधांची डिलीव्हरी होऊ शकते त्याच ड्रोनच्या तंत्रज्ञानाने सामाजविघातक कृत्येही होऊ शकतात. पण, अशा कोणत्याही आधुनिक ड्रोन हल्ल्यासाठी आपली मुंबई, आपला महाराष्ट्र आपल्या राज्याची सुरक्षा यंत्रणा तयार आहे का? तर दुर्देवाने याचं उत्तर नाही! असं आहे. त्यामुळे ड्रोन हल्ल्यापासून राज्याची सुरक्षा रामभरोसे आहे असंच म्हणावं लागेल.

याबाबत महाराष्ट्र सायबर अधिक्षक यशस्वी यादव यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, "महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा (Anti Drone System) बसवली पाहिजे. ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर स्फोटकं बसवता येतात. याशिवाय, त्यांचा पाठलाग करणंही कठीण आहे. आरोपीने मोबाईल फोन वापरला असेल तर त्याच्या आयएमईआय क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोनला आँपरेट करता येत नाही. याशिवाय अनेकदा संशयित व्यक्ती डार्क नेट वर sympathizer ड्रोन हल्ला, रासायनिक पदार्थाचा हल्ला करण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. आरोपी, हँकर्स हे डार्क नेटचा (Dark Web) वापर बहुतांश करत असतात. या आरोपींना पकडणे कठीण असते. कारण हे ते अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर करत असतात त्यामुळे त्यांचा शोध लावणं कठीण असंत."

सायबर तज्ज्ञांच्या आणि महाराष्ट्र पोलीसांच्या या गंभीर मागणीला आणि इशाऱ्याला सरकारनं तेवढचं गंभीरपणे घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि संपुर्ण राज्याच्या सुरक्षेसाठी ड्रोनविरोधी यंत्रणा लवकरात कार्यान्वयीत करणं अतिशय गरजेचं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशकात शांतीगिरी महाराज शिंदेंचे उमेदवार? महाराजांच्या दाव्यामुळे शिंदे गटात खळबळ

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

SCROLL FOR NEXT