Jammu-Kashmir मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले संशयित ड्रोन!

शहराच्या बाहेरील भागात कानाचक पट्ट्यात संशयित ड्रोन आढळून आले आहे. याबद्दल मिळताच, सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे.
Suspected drone spotted
Suspected drone spottedSaam Tv
Published On

जम्मू : शहराच्या बाहेरील भागात कानाचक पट्ट्यात संशयित ड्रोन (Suspected Drone) आढळून आले आहे. याबद्दल मिळताच, सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. (Suspected drone spotted)

पोलिसांनी माहिती दिली की, मंगळवारी रात्री उशिरा संधवन भागातील धाब गावातील स्थानिकांना ड्रोनच्या हालचाली दिसून आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना ही बाब कळवली.
तर, "जलद गतीने शोध मोहीम राबवत, पोलिस आणि बीएसएफच्या संयुक्त पथकांनी परिसरात शोध मोहीम राबवली परंतु काहीही सापडून आले नाही," अशी माहिती देण्यात आली आहे.

Suspected drone spotted
PM Modi Security Breach: सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन

पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी देखील याबद्दल शोध घेण्यात आला परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. ते म्हणाले, “प्रजासत्ताक दिन जवळ येत असल्याने, पाकिस्तानच्या (Pakistan) बाजूने ड्रोनच्या हालचाली नाकारता येत नाहीत, परंतु आम्ही सतर्क आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर बारीक लक्ष ठेवत आहोत,” अशीही माहिती देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com