महाराष्ट्रात चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन आदेश जारी
२० नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रवीण कुंडलिक पुरी यांची बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती
संजय गडदे,साम प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रशासकीय वर्तुळात मोठी घडामोड घडू लागल्या आहेत. राज्य सरकारने चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. दोन दिवसापूर्वीच 3 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती, असे एकूण सात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनात मोठे फेरबदल घडत आहेत. याप्रकरणी 20 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या बदल्यांमध्ये दिव्यांग कल्याण विभाग, बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ आणि राज्यकर विभागातील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या प्रशासकीय फेरबदलात अशोक वामन काकडे, प्रवीण कुंडलिक पुरी, गुलाब राजाराम खरात आणि मकरंद प्रल्हाद देशमुख या चार अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
1. अशोक वामन काकडे : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या अशोक वामन काकडे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय.
2. प्रवीण कुंडलिक पुरी : प्रवीण कुंडलिक पुरी यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
3. गुलाब राजाराम खरात : गुलाब राजाराम खरात यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
4. मकरंद प्रल्हाद देशमुख : मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या मकरंद प्रल्हाद देशमुख यांची मुंबईतील राज्यकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून 20 नोव्हेंबर 2026 रोजी या चार IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचे बदल झाले आहेत. नव्या पदांवर हे अधिकारी कोणत्या पद्धतीने कामकाज करतात, याकडे आता लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.