Maharashtra Government Jobs News Saam Tv
मुंबई/पुणे

Government Jobs : तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती, कसा अर्ज कराल? जाणून घ्या

Maharashtra Government Jobs News : महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागामार्फत भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती जाहीर. अर्ज १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वीकारले जाणार असून परीक्षा १३ ते १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात ९०३ भूकरमापक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

  • अर्ज १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे.

  • परीक्षा १३-१४ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

  • या भरतीसाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आणि आयटीआय सर्व्हेअर पात्रता आवश्यक आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभाग – २५९, नाशिक – १२४, छ. संभाजीनगर – २१०, अमरावती – ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे.

अर्ज कुठे कराल ?

उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईनरित्या स्वीकारण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठीची पात्रता

मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) धारक, किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्व्हेअर) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल.

आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख विभागाने माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मीच बाळासाहेब ठाकरे" संदेश देताय का? – राऊतांचा शिंदेंना सवाल

Chennai Shocked : थर्मल पॉवर प्लांटमध्ये मचान कोसळला, ९ मजुरांचा जागीच मृत्यू, चेन्नईत घडली दुर्घटना

Shocking: 'सर्वांची आई मरते, नाटक करू नको कामावर ये', सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर बॉस भडकला, ई-मेलचे फोटो व्हायरल

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

SCROLL FOR NEXT